logo

निमखेडी फाट्यावरून २ पिस्तूल मॅगझिनसह १ लाख ७३ हजाराचा माल जप्त !

वसीम शेख ( AIMA news ) बुलढाणा
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी बुलढाणा , लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २३ एप्रिल रोजी मलकापूर उपविभागातील गोपनीय माहिती वरून यांचे माहिती मिळाली की, एक इसम हा दुचाकी घेऊन जळगाव जामोद येथे येत असून तो स्वतः जवळ देशी पिस्टल व जिवंत काडतुसे बाळगून आहे , अशा मिळालेल्या माहितीनुसार २३ एप्रिल रोजी दुपारी २.५५ वाजता निमखेडी फाटा येथे धाड टाकली असता त्यांच्याकडे काही मुद्देमाल मिळून आला २ देशी बनावटीचे पिस्तूल मॅगझीन सह किंमती प्रत्येकी ४० हजार रूपये असे एकूण ८० हजार रूपये, २३ जिवंत राऊंड किंमती २३ हजार रुपये, एक दुचाकी वाहन किमती ७० हजार असा एकूण १ लाख ७३ हजार रुपयाचा मुद्देमाल मिळून आला. आरोपी अशोकसिंग नंदासिंग पटवा आणि त्याची पत्नी नारंगी कौर अशोकसिंग पटवा रा. पाचोरी तालुका खकणार जिल्हा बऱ्हाणपूर म.प्र. यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची ️कारवाई सपोनि आशिष चेचरे, दिपक लेकुरवाळे, एजाज खान, गणेश पाटील, युवराज राठोड, गजानन गोरले, आशा मोरे यांच्या पथकाने केली आहे.

78
2478 views